Saturday, September 5, 2026

भागीरथी

पानिपतची बऱ्याच वर्षांनी पुन्हा वाचतेय. आता त्याच्याशी relate होणं, पात्रांशी empathize होणं सोपं जातंय. त्यातलीच एक भागीरथी. दत्ताजी शिंद्यांची गर्भवती पत्नी. दत्ताजी नाजीबाशी लढणार म्हंटल्यावर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल ते मनात राहून राहून येउ लागले आणि म्हणून शेवटी कागदावर उतरवले.

हळूवार हात ती फिरवी
उदरातील जीव जपाया
उडे धूळ टापांनी
लागला वन्ही पेटाया

भाळावर कुंकू टपोरे
डोळ्यात प्रखर अंगार
परि उदरातील नाजूक हाक
मन होई हळवे अलवार

हृदयी धैर्य खेचले
प्रसंग कोणता येईल
नव जीव जन्मताना
पोरका का तो होईल

मग वचन दिले आठवते
नाही बांध फुटणार
तांबड्या भडक चितेची
पायरी नाही चढणार

मन आश्वासक उदगरले
जाज्वल्य प्रभा उमटून
तो लढेल मुलूखासाठी
मी आला काळ लढवीन

No comments:

Post a Comment